‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

    इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत "महात्मा बसवेश्वर" यांच्या जयंती निमित्त एक व्यक्ती एक संस्था यांना "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता -शिवा पुरस्कार" देण्यात येणार आहे. तरी संस्था व व्यक्तींनी पुरस्काराचे अर्ज इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय येथे दि. 22 मार्च पुर्वी पाठवावेत असे आवाहन  इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे.
   राज्यातील  वीरशैव- लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक समाज प्रबोधनकार व समाज सेवक आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार" देण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये शासनाने घेतलेला आहे.
   या पुरस्कारासाठी वीरशैव - लिंगायत समाजाकरिता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था असाव्यात. वीरशैव –लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्षे कार्य केलेले असावे. पुरस्कारासाठी पुरुषांचे वय 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे व स्त्रियांचे वय 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
   तरी इच्छुक व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव सादर करण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाशी संपर्क साधावा.