परुळे येथे ‘गीतरामायण’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

परुळे येथे ‘गीतरामायण’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला.

     बहुप्रतिक्षित अयोध्या येथील श्री राम मंदिर पुनःप्राणप्रतिष्ठा व मूर्ती पुन:प्रतिस्थापना सोहळ्याचे अवचित्य साधत लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी तर्फे श्री देव आदिनारायण देवस्थान परुळे येथील व्यासपीठावर २३ रोजी ‘गीतरामायण’ या कार्यक्रमाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम होण्यासाठी अनेक दृष्य अदृश्य अशा मदतीच्या हातांची जोड घेत न भूतो न भविष्य ती असा हा नेत्रदीपक सोहळा साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या उद्देशाने लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी च्या सामाजिक बांधिलकीची जाणीव पुनश्च एकदा उपस्थितांना झाली आणि कौतुकांचा वर्षाव करीत कार्यक्रम उत्तमरित्या पार पडल्याची पोच पावती रसिक श्रोत्यांनी दिली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लोकमान्य सोसायटी तर्फे संचालक मंडळातील सदस्य पंढरी परब हे देखील उपस्थित होते. सोबतच तरुण भारत सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख शेखर सामंत यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.तसेच देवस्थान समिती तसेच ग्रामपंचायत परुळे तर्फे देखील कार्यक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या.
   यावेळी व्यासपीठावर श्री आदिनारायण देवस्थान परुळेचे अध्यक्ष अनंत देसाई, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप सोसायटी चे संचालक मंडळाचे सदस्य पंढरी परब,
तरुण भारत सिंधुदुर्गचे शेखर सामंत, म्युच्युअल फंडस् चे प्रतिनिधी श्री.जाधव,इफकोटोकियो चे प्रतिनिधी श्री.काकोसेकर, परुळे ग्रामपंचायत उपसरपंच संजय दुधवडकर, परुळे ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रदीप प्रभू, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप सोसायटी सावंतवाडी क्षेत्रीय कार्यालय येथून क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब पांडव आदी उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा निवेदन लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी शाखा परुळे चे लेखापाल श्री चिंतामणी जगन्नाथ सामंत.प्रास्ताविक लोकमान्य मल्टी.को ऑप सोसायटी च्या परुळे शाखेतून शाखा व्यवस्थापक श्रीमती. गौरी सामंत आभार प्रदर्शन  लोकमान्य मल्टी.को ऑप सोसायटी च्या परुळे शाखेतून वरिष्ठ लेखापाल श्रीमती स्मिता ठाकूर गीतरामायण कार्यक्रम सादरकर्ते स्वर वैभव क्रिएशन सांगली यांनी सदर कार्यक्रम सादर केला.
  गीतरामायण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री देव आदिनारायण देवस्थान चे सदस्य महेश सामंत यांनी करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या मध्ये बाल कलाकार म्हणून रामरायांच्या भूमिकेत विनायक जोशी, सीतेच्या भूमिकेत चैतन्या पेडणेकर, लक्ष्मणच्या भूमिकेत कु.तनिष्क पेडणेकर, मारुतीच्या भूमिकेत लौकिक तारी यांनी भूमिका साकारल्या.