चिपळूण येथील महिला स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांची परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट

परुळे.
चिपळूण येथील कोळकेवाडी ग्रामपंचायत महिला स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांनी परुळे बाजार ग्रामपंचायत येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी काथ्या प्रकल्प, प्लास्टिक संकलन युनिट, ग्रामपंचायत अंगणवाडी व्यायामशाळा, सांडपाणी प्रक्रिया या प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी माजी सरपंच सुरेखा बुवादे, ग्रामस्थ, अध्यक्ष सुप्रिया शिंदे, ग्रामसेवक सुनील पिंगळे, यांसह परुळे बाजार माजी सरपंच प्रदीप प्रभू, ग्रामसेवक शरद शिंदे, स्वच्छता दूत प्रेमा जाधव, सी.आर.पी. दीपा चव्हाण यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या प्रकल्पांची दखल घेत महिला स्वयंसहायता समूह सदस्यांनी परुळे बाजार ग्रामपंचायतीची स्तुती केली.