वेंगुर्लेच्या बॅ. खर्डेकर महाविद्यालयाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्राचार्यांचा सन्मान

वेंगुर्ला
वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा "सर्वोत्तम महाविद्यालय" पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांचा भाजपा वेंगुर्ला महिला मोर्चाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे आणि डॉ. गोस्वामी यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. हेमंत गावडे, जिल्हा निमंत्रित श्री.साईप्रसाद नाईक, तालुकाध्यक्ष श्री. विष्णू उर्फ पप्पू परब, माजी नगरराध्यक्ष श्री. राजन गिरप, मच्छिमार सेल अध्यक्ष श्री. दादा केळुसकर, तालुका सरचिटणीस श्री.वसंत तांडेल, युवा मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री.प्रणव वायंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, शहराध्यक्ष सौ.श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस सौ.आकांशा परब, माजी नगराध्यक्ष सौ.पूजा कर्पे, महिला मोर्चा तालुका चिटणीस सौ.शीतल आंगचेकर, प्रार्थना हळदणकर, तालुका सरचिटणीस सौ.चेतना राजपूत, माजी नगरसेविका सौ.ईशा मोंडकर, सदस्य सौ.हसीना मकानदार, रसिका मठकर, वृंदा मोर्डेकर तसेच भाजपचे यावेळी विविध मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.