वेंगुर्ले- भटवाडी येथे एसटी व कॅन्टरचा अपघात.....दोघेजण जखमी

वेंगुर्ले- भटवाडी येथे एसटी व कॅन्टरचा अपघात.....दोघेजण जखमी

 

वेंगुर्ले

 

       वेंगुर्ले येथून कुडाळकडे जाणारी एसटी बस आणि वेंगुर्लेकडे येणारा कॅन्टर या दोन गाड्यांमध्ये वेंगुर्ले भटवाडी आडी स्टॉप येथे मुख्य रस्त्यावर समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघात आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला. वेंगुर्ले आगाराची बस कुडाळच्या दिशेने जात होती. तर त्याच दरम्यान कॅन्टर वेंगुर्लेच्या दिशेने येत होता.आडी स्टॉप येथे दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या आणि अपघात झाला. ज्यांना किरकोळ दुखापत होती त्यांना उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे उपचारासाठी नेऊन घरी सोडण्यात आले आहे. तर दोन जणांना जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. यासंबंधी पुढील कारवाई वेंगुर्ला पोलिसांकडून सुरू आहे.