सर्वत्र शिवसेनेचा विजय निश्चित आहे - आमदार निलेश राणे

सर्वत्र शिवसेनेचा विजय निश्चित आहे - आमदार निलेश राणे

 

सावंतवाडी

 

       नगरपालिकेच्या या निवडणूकीत युती व्हावी यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मात्र, युती होऊ शकली नाही. आम्ही एकाच सत्तेत बसलो आहोत. तीन तारीखनंतर आम्ही एकत्रच असणार आहोत. मात्र, आज एकामेकाच्या विरोधात उभे राहिलोय ते केवळ कार्यकर्त्यांसाठी. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आमच्या निवडणूकांमध्ये मेहनत घेतली त्यांच्या निवडणूकीत युती व्हावी अशी अपेक्षा व मागणी होती. सर्व अगदी सोप होत मात्र आता या लढाई होतच असल्याने आम्ही तुमच्या सोबत आहोत व सर्वत्र शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
        सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ७ च्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. दिपक केसरकर, पक्ष निरीक्षक राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. निता कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, सौ. संजना परब, उमाकांत वारंग, आनंद शिरवलकर, भाई शिरवलकर तसेच उमेदवार अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, उत्कर्षा सासोलकर, गोविंद वाडकर, वैभव म्हापसेकर, बंड्या कोरगावकर, परिक्षीत मांजरेकर, स्नेहा नाईक, हर्षा जाधव, बासित पडवेकर, संजना पेडणेकर, प्रसाद नाईक, वेदिका सावंत, पुजा अरवारी आदी उपस्थित होते.
       संजू परब तुमच्या उमेदवारीमुळे जिल्ह्याचा रेट वाढलाय. तुमच्या विजयात वहिनींचा वाटा मोठा आहे. केसरकर आहेतच व मी तर आहेच. कारण माझ्या पडत्या काळात संजू माझ्या सोबत राहिला. धिरुभाई म्हणायचे माणूस कसा ओळखायचा तर तो कोणासोबत उभा आहे. स्व. बाळासाहेब बोलले होते पैसे येतील जातील मात्र एकदा इज्जत गेली तर परत येत नाही. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केल.
      संजू परब यांनी पक्षावर अन्याय होत असल्याने सर्वांना अंगावर घेतले. त्याने घेतलेली भूमिका ही लोकांसाठी होती. नाहीतर राजघराण्यावर बोलण्याची कोण हिंमत करेल. राजघराण्याबाबत आम्हालाही आदर आहे. मात्र, तो घेत असलेले विषय महत्वाचे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
         संजू परब जी पक्षसंघटना वाढवतोय ती केवळ पक्षासाठी. आम्ही सांगितलं म्हणून. आम्ही सेवक आहोत. आपलं काम व आपली तळमळ मी जवळून पाहत आलोय. युवकचा अध्यक्ष असल्यापासून तो माझ्या जवळ आला. तेव्हा पासून तो माझ्या सोबत आहे. असा सहकारी लाभला हे भाग्य आहे.
      त्यामुळे मी त्याच्या सोबत आहे व त्याचा विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले. केसरकरांच्या स्वभावाच आश्चर्य वाटत. एवढ सर्व होत असताना ते शांत कसे राहतात हे समजत नाही. आम्हालाही क्लास लावावा लागेल. मात्र आम्ही आक्रमक होतोय ते केवळ कार्यकर्त्यांसाठी व जनतेसाठी त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूकीची ही लढाई 'प्रजा विरोधात राजा' अशी होत आहे. आता ते दिवस गेले की कोणीतरी आदेश द्यावा व जनतेने तो ऐकावा. त्यामुळे जनतेची व कार्यकर्त्यांची ही निवडणूक. काहीही झाल तरी जिंकणारच, असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला