कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोडे यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार.

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोडे यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार.

कणकवली 

    कणकवलीत सा.बां. विभागाचा कार्यभार कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी हाती घेतल्यानंतर विविध कामांना गती देत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार गतीमान केला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अजयकुमार सर्वगोड यांनी कणकवली आणि कुडाळ विभागात विविध विकास कामे मार्गी लावली. त्यांच्या या कार्यपद्धतीचे कौतुक वेळोवेळी पालकमंत्र्यांनी केले आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालेल्या या सत्कारामुळे आपण भारावून गेलो असून अधिकाधिक लोकाभिमूख काम करण्याचे बळ आपल्याला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये  बांधकाम खाते गतिमान अणि पारदर्शक करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भडगाव व अणाव घाटाचे पेड येथील उंच पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता सूरज गिरी, ठेकेदार दीपक दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे तसेच सर्व अभियंता उपस्थित होते.