सरस्वती कोचिंग क्लासेसचे पाच विद्यार्थी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण

सरस्वती कोचिंग क्लासेसचे पाच विद्यार्थी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण

 

मुंबई

 

       सरस्वती कोचिंग क्लासेसचे कुमारी पवित्रा शेट्टी, कुमार प्रशांत जाधव, कुमारी गायत्री जाधव, कुमार वैभव गुंडाळ व कुमारी दिपाली विंचू हे मध्यम वर्गीय कुटुंबातील पाच माजी विद्यार्थी सनदी लेखापाल (सी. ए.)परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा सन्मान सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक अजित कदम, सुधाकर कदम व ज्येष्ठ शिक्षक संतोष रावराणे यांनी केला. दहावी, बारावी, बी. कॉम. परीक्षेतही ह्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त करून अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या  सी. ए. परीक्षेतही  घवघवीत यश संपादन केले आहे.  विशेष म्हणजे कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना जिद्दीने  सी.ए. होण्याचा या विद्यार्थ्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. ईश्वरी कृपा, आईवडिलांचे व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तसेच कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य, अथक प्रयत्न यामुळे या विद्यार्थ्यांनी  हे यश संपादन केले. या  यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खासदार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, आमदार योगेश सागर, मा. नगरसेवक श्रीमती शुभदा गुढेकर, श्रीकांत कवठणकर, दिपक (बाळा) तावडे, प्रतिभा गिरकर, शिवसेना विभागप्रमुख संतोष राणे, भूषण विचारे व इतर अनेक  मान्यवरांनी तसेच विभागातील सेवाभावी सामाजिक व शैक्षणिक संस्था, नातेवाईक आणि मित्रमंडळीने सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.