वेंगुर्ला कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्या सार्वजनिक नवरात्रौत्सव कमिटी अध्यक्षपदी उमेश येरम. कॅम्प कॉर्नर मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी नवरात्रौत्सव.

वेंगुर्ला कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्या सार्वजनिक नवरात्रौत्सव कमिटी अध्यक्षपदी उमेश येरम.   कॅम्प कॉर्नर मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी नवरात्रौत्सव.

वेंगुर्ला.

     शहरातील कॅम्पकॉर्नर मित्रमंडळाच्या दि.३ ते १२ ऑक्टोंबर कालावधीत सलग २५ व्या वर्षी म्हणजे रौप्यमहोत्सवी सार्वजनिक नवरात्रौत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी उमेश येरम, उपाध्यक्षपदी रमेश उर्फ राजू परब, सचिव पदी नेल्सन मोंतेरो, खजिनदारपदी सुशिल परब तर सल्लागारपदी अँड.श्याम गोडकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
   वेंगुर्ला शहरातील कॅम्पकॉर्नर मित्रमंडळातर्फे सलग २५ व्या वर्षी दि. ३ ते १२ ऑक्टोंबर कालावधीत सार्वजनिक सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२४ साजरा करण्यासंदर्भात आयोजित केलेली सभा मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक उमेश येरम यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.
    या बैठकीत सार्वजनिक नवरात्र उत्सव नियोजन कमिटीची निवड एकमताने करण्यात आली. या कमिटीच्या अध्यक्षपदी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक उमेश येरम यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी रमेश उर्फ राजू परब यांची, सचिव पदी नेल्सन मोंतेरो, सहसचिवपदी विलास परब, यांची तर खजिनदार सुशिल परब, सहखजिनदार पदी देवीदास वालावलकर, सल्लागारपदी अँड.श्याम गोडकर यांची तर सदस्यपदी आनंद शिरोडकर, मनिष रेवणकर, महेश टेंबकर, विनायक वारंग, महेश घावनळकर, सिल्वान डिसोजा यांची निवड एकमताने करण्यात आली.
   या बैठकीत नवरात्रौत्सव काळात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.