वेंगुर्ले प्रादेशिक फळसंशोधन केंद्राला शरद पवार यांची भेट

वेंगुर्ला
केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळसंशोधन केंद्राला भेट देऊन शास्त्रज्ञ व संशोधकांशी चर्चा केली. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाने कृषी क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी केलेल्या विविध संशोधनाचा आढावा घेतला.यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. महेंद्र गवाणकर यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे सचिव हळदवणेकर, उद्योजक अवधूत तिंबलो, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते व्हिक्टर डॉन्टस, माजी मंत्री प्रवीण भोसले, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा आदिती पै, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता कुबल, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, बाळ कनयाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू उत्पादक संघटना अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, माजी उपनगराध्यक्ष दाजी परब, डॉ. संजीव लिंगवत आदींसह विविध शास्त्रज्ञ, संशोधक व आंबा, काजू उत्पादक उपस्थित होते. शरद पवार यांनी संशोधन केंद्राच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व कृषी विकासासाठी अधिक प्रगल्भ संशोधन करा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.पवार यांनी वेंगुर्ले शहरभेटीत सकाळी बॅ. नाथ पै मेमोरियल व येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट दिल्यानंतर दुपारी मोचेमाड येथील फोमेंतो प्रकल्पाच्या 'आराकिला' रिसॉर्टवर विश्रांती घेतली.