वेंगुर्ले तालुक्यातील शाळेत आदर्श हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे उद्घाटन

वेंगुर्ले
स्वच्छ भारत आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यवर्धक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले तालुक्यातील शाळेत हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे आदर्शवत बांधकाम करण्यात आले असून, त्याचा उद्घाटन समारंभ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या सेस फंडातून आवश्यक निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीचा उपयोग समग्र अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने बांधकाम करण्यासाठी करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते उमेश येरम, बाळू देसाई व प्रज्ञाताई परब, यशवंत किनळेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्रीम. संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब, सुधर्म गिरप, सानिका कदम व सुनंदा खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हर्षल परब, माजी उपाध्यक्षा श्रीम. अस्मिता राऊळ, माजी अध्यक्ष वासुदेव उर्फ बाळा परब, मेघना राऊळ, राकेश वराडकर, मालवणकर, गावडे तसेच अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ वर्ग यांचा समावेश होता. बाळू देसाई व उमेश येरम यांनी आपल्या भाषणात हँडवॉश स्टेशन व शौचालयाच्या उपयोगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "स्वच्छता ही केवळ आरोग्याची गरज नसून विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलभूत भाग आहे. अशा सुविधा शाळांमध्ये उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय रुजते आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो." तसेच या शाळेतील बांधकामाची गुणवत्ता, रचना आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार केलेली सुविधा ही वेंगुर्ले तालुक्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरावी असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परब यांनी केले आणि आभार प्रदर्शन संध्या बेहरे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक आणि शाळा समिती सदस्य यांनी शाळेस सहकार्य करत आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली