लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्ट उभादांडा वेंगुर्ला आयोजित वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्ट उभादांडा वेंगुर्ला आयोजित वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

 

वेंगुर्ला

       ग्रामीण भागातील  शालेय विद्यार्थी यांच्यासाठी कार्य करण्याचा हेतू ठेवून स्थापन झालेले लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने केपादेवी मंदिर मूठ उभादांडा वेंगुर्ला येथे ट्रस्टचा वह्या वाटप कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सोबत कुर्लेवाडीतील ज्येष्ठ भजनी बुवा सावळाराम कृष्णा कुर्ले, उभादांडा ग्रामपंचायत सदस्य नम्रता कुर्ले, राजन कुर्ले, भानुदास कांबळी, भाग्यवान गिरप, ट्रस्टचे सहसचिव हिरिशचंद्र गिरप सल्लागार रामचंद्र देवजी, किशोर सोनसुरकर, मुख्यद्यापक घाडी, सचिन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम प्रस्ताविकामध्ये  देवजी यांनी ज्या गावामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो व केपादेवी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मी आणि माझी आई अनेक समस्यातून मार्ग काढत आज इथेपर्यंत पोहोचलो त्या मातेच्या सन्मानार्थ  विद्यार्थी युवक त्याचबरोबर समाजातील गरजू लोकांसाठी कार्य करण्याचा संकल्प याप्रसंगी बोलून दाखविला. भविष्यामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम, वाचनालय आदि समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. ट्रस्टच्या सहसचिव हिरिशचंद्र गिरप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी ट्रस्टच्या या उपक्रमामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना  मान्यवरांच्या शुभहस्ते  शालेय वह्या वाटप करण्यात आले. एक युवक स्व मेहनतीवर शिक्षण घेऊन आणि सोबत व्यायामाचा सराव करून पोलीस दलामध्ये आईच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलीस झाला व आपली समाजाप्रती असणारे कर्तव्य पार पाडण्यासाठी आईच्या नावाने स्थापन केलेल्या या ट्रस्टला भविष्यामध्ये चांगले दिवस येतील आणि यासाठी आम्ही सर्व कुर्लेवाडीवासी यांच्यासोबत राहो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन गिरप व इतर मान्यवर सावळाराम कुर्ले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यायामपटू व दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर यांनी केले तसेच लवकरच ट्रस्टच्यावतीने  समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम आयोजित केला जाणार असून "स्वच्छ किनारा सुंदर किनारा" अभियान राबविले जाणार आहे तसेच पर्यटन प्रमुख ठिकाणी स्वछताबाबत फलक लावले जाणार आहेत.