परुळे येथे फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात आला.

परुळे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, व ग्रामपंचायत परुळे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण जनजागृती कार्यक्रम अंतर्गत परुळे आदिनारायण मंदिर येथे वनराई बंधारा घालण्यात आला असून यावेळी फळ संशोधन केंद्र चे अधिकारी डॉ. एम. एस. गवाणकर, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला तसेच केंद्रातील इतर अधिकारी व कर्मचारी डॉ. व्ही. एस. देसाई,
डॉ. बी. जी. ठवरे, एस. एस. कोळसुलकर, डॉ. एम. पी. सणस, एल. एस. खापरे, पी. एम. तल्हा, ए. जी. साटेलकर, एस. एस. म्हापुसकर, व्ही. एन. गेडाम,गावडे, पाल्येकर, परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबड, पालकर, सदस्य प्रदीप प्रभू, अभय परुळेकर, प्राजक्ता पाटकर, सुनाद राऊळ, ग्रामसेवक शरद शिंदे, कोतवाल वरक, ग्रामपंचायत कर्मचारी दीपक दाभोलकर आदी उपस्थित होते.