वेंगुर्ला परुळे येथे उद्या महिला दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम

वेंगुर्ला परुळे येथे उद्या महिला दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम

 

परुळे

 

           वेंगुर्ला तालुक्यातील परुळे कुशेवाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व महिलां साठी शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता ग्रामपंचायत कुशेवाडा येथे महिला दिनानिमित्त महिलांन साठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सत्रात त्या विभागातील ॲड. संघवी अनिल कदम यांना "महिलांचे संरक्षण विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी" या विषयावर तसेच  सामाजिक कार्यकर्ता कु. वैष्णवी सहदेव कदम यांना "जागतिक महिला दिनाचे महत्व" या विषयावर मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमानंतर महिलांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात येणार असून चित्रपटादरम्यान अल्पोपहाराची व्यवस्था केली गेली आहे. तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन कुशेवाडा सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी केले आहे.