श्री महापुरुष देवालय कासार्डे येथे २ मे रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री महापुरुष देवालय कासार्डे येथे २ मे रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 


कणकवली

 

     प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि. २ मे रोजी श्री महापुरुष देवालय कासार्डे भोगले-पारकरवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स.१० वा समस्त भोगले बंधू आयोजित श्री सत्यनारायण महापूजा, दु. १ ते ३ वा. पर्यंत महाप्रसाद, सायं-७ ते रात्री ९.३० वा. स्थानिक भजने रात्रौ १० वा गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळ, हुंबरट यांचा  महापौराणिक नाट्य प्रयोग खुनाची सुडाग्नी अर्थात ज्वाला (संचालक आप्पा दळवी) महानाट्य प्रयोग सादर होणार आहे.तरी भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री महापुरुष देवालय व समस्त भोगले बंधू भोगले-पारकरवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.