वेंगुर्ला येथील अचानक मंडळाची जागृत व सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रावर भजन सेवा. देवस्थानाच्या व्यवस्थापकांकडून भजनी कलाकारांचे कौतुक.

वेंगुर्ला.
संदेश निकम मित्रमंडळाचे संस्थापक व वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या सहकार्याने अधिक श्रावण महिन्याचे औचित्य साधून नरसोबाचीवाडी येथील जागृत व सुप्रसिद्ध दत्तमंदिर तीर्थक्षेत्रावर वेंगुर्ला येथील अचानक भजन मंडळाने बुधवार दि १६ ऑगस्ट रोजी मंदिर व्यवस्थापनाची परवानगी घेत तब्बल दिडतास भजन सेवा केली.
अधिक श्रावण मासात भक्ती भावाने सेवा करण्याऱ्या भाविकांना त्याचे चांगले फळ मिळते.असे अध्यात्मिक अभ्यासकांकडून सांगितले जाते. यामुळे नरसोबाचीवाडी या तिर्थक्षेत्रावर बुधवारी शेकडो भाविक दर्शनासाठी व पुजा-पाठ करण्यासाठी दाखल झाले होते. वेंगुर्लेतील अचानक भजन मंडळाच्या सदस्यांनी तब्बल एक तास सादर केलेल्या भजनाचा आनंद भाविकांनी ते भजन ऐकण्यासाठी बसून लुटला. अचानक भजन मंडळाच्या भजनी वारकऱ्यांचे कौतुक केले.
त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर ठिकाणी, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात अचानक भजन मंडळाने तब्बल दिड तास भजन सेवा केली. या प्रत्येक तिर्थक्षेत्रावर देवदर्शनासाठी आलेल्या महिला व पुरुष भाविकांनी भजन रंगात आलेले असताना त्यात सहभाग घेतला. या तिन्ही देवस्थानच्या व्यवस्थापकांनी सुध्दा भजनासाठी परवानगी घेणारे वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष संदेश निकम व अचानक भजन मंडळाचे भजनी कलाकार यांचे खास कौतुक केले.