विजयदुर्ग आगाराला ५ नवीन एसटी बसेस प्राप्त

विजयदुर्ग आगाराला ५ नवीन एसटी बसेस प्राप्त

 

विजयदुर्ग

 

       सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे विजयदुर्ग आगाराला BS6 प्रकारातील ५ नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या नवीन बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, सभापती रवी पाळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे, पडेल सरपंच भूषण पोकळे, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, महेश बिडये, प्रसाद देवधर, निलेश मणचेकर, महेश चव्हाण, ग्रेसिस फर्नांडिस, संजना आळवे (महिला मोर्चा पडेल मंडळ अध्यक्षा), शुभा कदम (ग्रा. पं. सदस्या), प्रतिक्षा मिठबाकर (ग्रा. पं. सदस्या), पूर्वा लोंबर (ग्रा. पं. सदस्या), गीता लळीत उपस्थित होते. याप्रसंगी आगार व्यवस्थापक विवेक जमाले, स्थानक प्रमुख सचिन डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी, ए. डी. वारे, दर्शन डोंगरे, दीपक मिठबवाकर, अमित डोंगरे, योगेश डोंगरे, विजयदुर्ग आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, चालक-वाहक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन बसगाड्यांमुळे विजयदुर्ग परिसरातील प्रवाशांना अधिक चांगल्या आणि आरामदायी सेवा मिळणार आहेत.