गडमठ येथे ४ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर, मोफत नेत्रतपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

गडमठ येथे ४ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर, मोफत नेत्रतपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

वैभववाडी.

    ह्युमन राईटस् असोशिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली आणि एकदंत फुड ॲन्ड बेव्हरेजिस (ऑरबेलो) यांच्या संयुक्त विद्यमाने कै.सौ. शिला शंतनू बांदिवडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरूवार दि. ४ एप्रिल २०२४ रोजी स.१० वा भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्रतपासणी व मार्गदर्शन शिबीर गडमठ गावठण येथे आयोजित करण्यात आले आहे.
  यावेळी मानवाधिकार असो. संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष- प्रकाश तेंडुलकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून गडमठ सरपंच - सौ. मालती मधुकर शेटे, स्पेक्टो मार्ट, कणकवलीचे प्रोप्रायटर - मंगेश चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
   तरी या रक्तदान शिबीर आणि मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबीराचा लाभ पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे वैभववाडी तालुका उपाध्यक्ष प्रणय बांदिवडेकर यांनी केले आहे.कार्यक्रमाचे स्थळ गडमठ (गावठणवाडी), ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग याबाबत अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबर ९०४९३४१२८२/ ९९३०५९९३५४ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.