भाजी वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट गाडीचा अपघात

भाजी वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट गाडीचा अपघात


कणकवली 


       मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू टेम्पो टँकरला धडक दिली आहे. यात टेम्पोतील भाजीपाला रस्त्यावर विखुरला गेला. तर टँकर रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. कोल्हापूर येथून फळे आणि भाजीपाला घेऊन टेम्पो गोव्याच्या दिशेने जात होता. तर महामार्गावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांना केसीसी बिलकॉमचा टँकर पाणी घालत होता. गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने रस्त्यावर थांबलेल्या टँकरला जोरात धडक दिली. यात टँकर जागीच पलटी झाला. तर टेम्पोचा एका बाजूचा पत्रा फाटला आणि आतील भाजीपाला रस्त्यावर विखुरला गेला. या अपघातानंतर सुमारे अर्धा तास मुंबई ते गोवा जाणारी वाहतूक बंद होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त टेम्पो बाजूला केला आणि वाहतूक सुरू केली.