जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतनधारकांचा मेळावा संपन्न. निवृत्तीवेतनधारकांना देय लाभ अधिक गतीमान होणार.

जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतनधारकांचा मेळावा संपन्न.  निवृत्तीवेतनधारकांना देय लाभ अधिक गतीमान होणार.

सिंधुदुर्ग.

   शासनाने आता ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ प्रणाली कार्यान्वयीत केली असून निवृत्ती वेतनधारकांना आता उपदानाची रक्कम कोषागार स्तरावरुन आहरित करुन संवितरीत केली जाणार असल्याने निवृत्तीवेतनधारकांना आता अधिक गतीमान पध्दत्तीने लाभ मिळणार आहेत, असे प्रतिपादन निवृत्तीवेतन धारकांच्या मेळाव्यात जिल्हा कोषगार अधिकारी अमित मेश्राम यांनी केले.
   पेन्शनर्स डे चे औचित्य साधून जिल्हा कोषागार कार्यालयात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या वर्षी सुट्टीच्या दिवशी पेन्शनर्स डे असल्याने गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात आला. या निमित्त निवृत्ती वेतनधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पेन्शनर्सच्या विविध समस्यांचा आढावा घेऊन त्यावर मार्ग काढण्याबाबत चर्चा झाली व कोषागार स्तरावरुन या समस्यांचे निराकारण करण्यात आले.
   यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, अप्पर कोषागार अधिकारी (नि.वे.) संजय घोगळे, अप्पर कोषागार अधिकारी ( ले.प.) वैशाली राणे, उप कोषागार अधिकारी स्नेहल मोरजे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश चव्हाण, कनिष्ठ लेखापाल यांनी केले तर उपलेखापाल  ज्ञानेश्वरी जाधव यांनी मागील मेळाव्याचे इतिवृत्त वाचन केले. कोषागार कार्यालयाचे कर्मचारी संजय गवस, सायली खांडेकर, मंजिरी शेडगे यांनी उपस्थित सर्व निवृत्ती वेतनधारकांचे स्वागत केले. या मेळाव्यास जिल्ह्यातील बहुसंख्य निवृत्तीवेतनधारक तसेच निवृत्ती वेतन धारक संघटनेचे पदाधिकारी,बँकाचे पदाधिकारी उपस्थित होते.