सावंतवाडी येथील एका जुन्या गोदामाला आग.......आग नियंत्रणासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाचा सहभाग
सावंतवाडी
सावंतवाडी येथील वनविभागाच्या समोर असलेल्या एका जुन्या गोदामाला आग लागली. ही घटना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास व्दारकामाई बिल्डींग समोर घडली. भरवस्तीत हा प्रकार घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब तत्काळ सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाला आणि अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला.घटनास्थळी आग विझवण्यासाठी सावंतवाडी येथील वॉटर टँकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ आधीच प्रयत्न करत होते. त्यात वेंगुर्ले अग्निशमन दलाचे फायरमन गणेश परब, वाहन चालक गौरव आरेकर, गणेश जाधव, कर्मचारी देवेंद्र जाधव, पंकज पाटणकर आणि विनय जाधव यांनी सामील होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. थोड्याच वेळात कुडाळ एमआयडीसी आणि कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन बंबही मदतीला दाखल झाले. या सर्व यंत्रणांच्या सामूहिक प्रयत्नांना यश येऊन पहाटे ३ वाजेच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठी हानी टळली असली तरी घरांचे नुकसान झाले आहे.

konkansamwad 
