१ एप्रिल पासून चीपी विमानतळवरुन पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू

१ एप्रिल  पासून चीपी विमानतळवरुन पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू

 


वेंगुर्ला


    1 एप्रिल  पासून सिंधुदुर्ग विमानतळवरुन पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू होणार असून सुरुवातीला fly 91 या कंपनीची सिंधुदुर्ग-पुणे विमान सेवा आठवड्यातून पाच दिवस सुरू होणार आहे. शुक्रवार आणि सोमवार वगळता गेले काही महिने सिंधुदुर्ग विमानतळावर आधी सुरू असलेल्या सर्व विमानसेवा एक एक करून कंपनीने काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केल्याने प्रवासी वाहतूक बंद होती त्यामुळे प्रवाशांना या सर्वांचा फटका बसला होता. यानंतर या विषयावरून बरेच राजकारण रंगले आरोप प्रत्यारोप झाले मात्र खासदार नारायण राणे यांनी याविषयी विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. नुकतेच त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा करून अलायांस एअर कंपनी ची सिंधुदुर्ग-मुंबई विमान सेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. एप्रिल महिन्याला मुंबई सेवा होईल असे संकेत आहेत त्याआधी फ्लाय 91 कंपनी तर्फे सिंधुदुर्ग-पुणे फेरी सुरू होत आहे  अशी माहिती  फ्लाय 91 चे  सिंधुदुर्ग  चे व्यवस्थापक सैनी यांनी दिली. त्याच बरोबर flay 91 कंपनी मुंबई-सिंधुदुर्ग सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत.