बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी; धनगर समाज नेते सुशांत शेळके यांची मागणी.
सिंधुदुर्ग
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली.यावेळी या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून १२ तास का लागले ? एकीकडे कायद्याचे राज्य म्हणायचं आणि एकीकडे पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? असा प्रश्न धनगर समाज नेते सुशांत शेळके यांनी उपस्थित केला आहे.या प्रकरणातील जो कोणी आरोपी आहे त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.देशात व राज्यात अलीकडे बलात्काराचे प्रकार वाढत चालले असून महायुती सरकारकडून बलात्कार करणाऱ्या अश्या प्रवृत्तीला फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.