स्थलांतरी, असंघटीत कामगारांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहिम.

स्थलांतरी, असंघटीत कामगारांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहिम.

सिंधुदुर्ग.

  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकांच्या वितरणासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत  विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली आहे.
   प्रचलीत नियमानुसार पडताळणीत, तपासणी करुन स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना उचित शिधापत्रिका वितरीत करुन शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तात्काळ देण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना दिल्या आहेत.
   तरी जिल्ह्यातील सर्व विना शिधापत्रिका धारक स्थलांतरीत,असंघटीत कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन विहित प्रक्रियेद्वारे अनुज्ञेय शिधापत्रिका प्राप्त करुन घ्यावी. असेही आवाहन करण्यात आले आहे.