मतदार याद्यांवर दावे-हरकतींना १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मतदार याद्यांवर दावे-हरकतींना १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग, दि. ३०

 

     भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत राहणार आहे.प्राप्त झालेले दावे व हरकती निकालात काढणे व नोटीस टप्प्यासाठी 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली असून, अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी 30 नोव्हेंबर 2026 रोजी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना विहित मुदतीत दावे-हरकती निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुधारित वेळापत्रकाबाबत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांना लेखी पत्राद्वारे अवगत करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.