महसूल विभाग हा शासनाचा कणा : जिल्हाधिकारी किशोर तावडे. ओरोस येथे महसूल पंधरवडा सांगता सोहळा संपन्न.

सिंधुदुर्ग.
महसूल विभाग हा शासन आणि प्रशासनाचा कणा आहे. शासनाचे ध्येयधोरण आणि निर्णयांची अंमलबजावणी करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्यात महसूल प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
महसूल पंधरवड्याचा सांगता सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडला.यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, ऐश्वर्या काळुशे तसेच जिल्ह्यातील तहसिलदार, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी हे शासनाचे निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.शासनाच्या सर्व मोहिमेत महसूल विभागाची भुमिका महत्वाची असल्याने आपल्याला जनतेची सेवा करण्याची संधी मिळते.त्यामुळे आपण महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी जोमाने काम करणे आवश्यक आहे.आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यावर उत्कृष्ट काम करण्याची जबाबदारी वाढली आहे.त्यामुळे सर्वांनी जनताभिमुख काम करण्याचे आवाहनही श्री तावडे यांनी दिले.
श्री देशमुख म्हणाले की,आपल्याला समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असल्याने महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम करताना तळागाळातल्या जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन काम करावे. महसूल विभागहा समाजाच्या सर्व घटकांशी संबंधित असल्याने केवळ महसूल पंधरवडा अभियान न राबवता वर्षभर जनतेसाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
निवासी उप जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी महसूल पंधरवड्याची पार्श्वभूमी आणि उद्देशाची माहिती दिली. महसूल सप्ताहाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाच्याबाबतीत लोकांमधील आधीची भावना बदलण्याचा प्रयत्न देखील प्रशासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत यांनी केले तर आभार नायब तहसिलदार श्री वरक यांनी मानले.
संवर्ग निहाय पुरस्कार प्राप्त अधिकारी -कर्मचारी
उपजिल्हाधिकारी- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
उपविभागीय अधिकारी- जगदिश कातकर,
तहसिलदार- ओंकार ओतारी, विरसिंग वसावे, संकेत यमगर
नायब तहसिलदार- संतोष बांदेकर, सविता कासकर, संजय गवस
लघुलेखक- संदिप शिंदे, एम.आर.जाधव
अव्वल कारकुन- गिता तांडेल, पी.बी.मांजरेकर
मंडळ अधिकारी- आर.व्ही. निपाणीकर, निता पवार, स्मिता तळटे, व्ही.एक. कोंदे, मनिषा बोडके, अजय परब
महसूल सहायक- गौरव ओरोसकर, जी.डी. बोवलेकर, सुशांत फाळके, प्रकाश नामपलले,
तलाठी- टि.ए. गायकवाड, मोसमी शिरसाट, व्हि.एस. शेणवी,
वाहन चालक- संजय तारी, एक.के.गवस, एल.एस.शेडगे,
शिपाई- दिलीप तांबे, अविनाश आमणे, गणेश गोसावी, आनंद वेंगुर्लेकर, एस.परब,
पोलिस पाटील- प्रकाश देसाई, महेश मांजरेकर, संतोष म्हाडगुत.