परुळे बाजार येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ......सरपंच प्रणिती आंबडपालकर यांच्या हस्ते उद्घाटन

परुळे बाजार येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ......सरपंच प्रणिती आंबडपालकर यांच्या हस्ते उद्घाटन

परुळे

      परुळे बाजार येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ सरपंच प्रणिती आंबडपालकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मिश्रा, आरोग्य सहाय्यक नागेश तोरसकर, मनोज दुधवडकर, मुख्याध्यापक रविंद्र गोसावी, समुदाय आरोग्य अधिकारी काजल परब, आरोग्य सेवक एस.एस. चव्हाण, आशा सेविका कोमल मांजरेकर, आरती परुळेकर आदी उपस्थित होते.२७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत १ ते १९ वयोगटातील बालकांना अल्बेंडाझोल ४०० मिलीग्रॅम गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. १ ते ३ वर्षांच्या बालकांना गोळी पाण्यात विरघळवून तर ३ ते १९ वयोगटातील मुलांना चावून देण्यात येते.अंगणवाडी बालके, शाळेतील विद्यार्थी आणि शाळाबाह्य मुलांचा या मोहिमेत समावेश असून रक्तक्षय दूर करून बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे हा उद्देश आहे.