केदारनाथ येथे हिमवर्षाव

केदारनाथ येथे हिमवर्षाव

 

केदारनाथ

 

   उत्तराखंड राज्यातील केदारनाथ या जगप्रसिद्ध शिवदेवस्थानाच्या स्थानी सातत्याने हिमवृष्टी होत आहे.  त्यामुळे या तीर्थस्थळाच्या यात्रेसाठी करण्यात येत असणारी सज्जता खंडित होत आहे. संपूर्ण देवस्थानाचा परिसरच हिमाच्या जाड आच्छादनाखाली झाकला गेला आहे. हिम दूर करुन मार्ग मोकळे करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तथापि, हिमाच्छादित देवस्थानाचेदृष्यही अत्यंत आल्हाददायक आहे. या वर्षी केदारनाथ मंदिराची द्वारे २२ एप्रिल या दिवशी उघडणार आहेत. आतापर्यंत यात्रा व्यवस्थापनाने ४ लक्ष ७३ सहन १६८ यात्रा इच्छुकांची नोंद आतापर्यंत केली आहे. सोनप्रयाग येथे नोंदणी कार्यालय सज्ज करण्यात आले आहे. यात्रेकरु भाविकांना कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे अशी माहिती देण्यात आली.