तळेरेत डंपरखाली चिरडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
कणकवली
मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावर डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रोहिदास हरिश्चंद्र देसाई (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे तळेरे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हिस रस्त्यावरून डंपर जात असताना रोहिदास देसाई अचानक मागील चाकाखाली आले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते नेमके कोणत्या परिस्थितीत चाकाखाली आले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
konkansamwad 
