वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ
वेंगुर्ले
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा सन्मान करताना शहरातील सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याचा संदेश या सांस्कृतिक महोत्सवातून देण्यात आला असल्याचे गौरवोद्गार उपविभागीय अधिकारी सावंतवाडी शारदा पवार यांनी काढले.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० वर्षपूर्ती, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या सहकार्याने येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे "सांस्कृतिक महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे. वेंगुर्ला शहराच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (२० मे) रोजी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी शारदा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसीलदार ओंकार ओतारी, नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, पत्रकार शेखर सामंत, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, न. प. चे ब्रँड अँबॅसिडर सुनील नांदोसकर, प्रसिद्ध गायक गुरु ठाकूर, श्रीम. वराळे आदी उपस्थित होते.मी मुंबईसारख्या ठिकाणी राहून जे काही लिहितो ते या मातीचे ऋण आहेत. वेंगुर्ले नगरपालिकेच्या सर्वच टीम ने या शहराचे सौंदर्य टिकवून गावपण जपल हे वाखाणण्याजोगी असल्याचे सुप्रसिद्ध गायक गुरू ठाकूर यांनी सांगितले. तर मोपा सारखी स्वच्छता आपल्या देशात जेव्हा प्रत्येक एसटी स्टँड वर दिसेल तेव्हा आपण यशस्वी झालो असे म्हणता येईल. मात्र वेंगुर्लेने ही स्वच्छता आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. हे एक स्वच्छता अभियान नाही तर वेंगुर्ला सुंदर करण्याचे कार्य आहे, हे सुरू ठेवा. मातीशी इमान असणारी ही नगरपालिका ते जपा असे आवाहन भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर यांनी केले.या महोत्सवाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जि प माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजप तालुकाध्यक्ष पपु परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.
konkansamwad 
