पुष्पा २: द रुल' चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित.

पुष्पा २: द रुल' चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित.

    पुष्पाःद राइज' या डिसेंबर २०२१ मध्ये आलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. पुष्पाची वाकडी चाल, त्याचे फिल्मी संवाद, श्रीवल्ली गाण्यावर त्याचा डान्स, श्रीवल्लीचा लूक, सामंथा रुथ प्रभूचं 'ऊ अंटावा' गाणं इ. या सगळ्याच गोष्टी कमाल जमून आल्या आणि सिनेमा सुपरहिट ठरला! यानंतर प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे की सिनेमाचा सीक्वेल 'पुष्पा २: द रूल'ची.या दरम्यान प्रेक्षकांना आनंदित करणारा सिनेमाचा पहिला वहिला टीजर समोर आला आहे.अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा २: द रुल'चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला असून आता प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता आहे. हा टीझर पुष्पाच्या राज्याची झलक दाखवतो आहे. धमाकेदार गाण्यांना त्यांचेच संगीत आहे. 'पुष्पा २: द रुल' हा सिनेमा येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.या टीजरच्या बीजीएमसाठी (बॅकग्राउंड म्युझिक) राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी संगीत दिले आहे. पुन्हा एकदा हे संगीत प्रेक्षकांच्या मनात घर करते आहे. डीएसपी यांनी 'पुष्पाः द राइज'साठी देखील गाणी रचली होती, 'सामी सामी', 'ऊ अंटवा' आणि 'श्रीवल्ली' या गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे.
   गेल्या काही दिवसांपासून 'पुष्पा २'मधील अल्लूच्या ज्या लूकने उत्सुकता वाढवली होती, तो साडीतील लूक या टीजरमध्ये पूर्णपणे दाखवण्यात आला आहे.महाकालीची पूजा ज्या मंडपात सुरू असते तिथे पुष्पा शंखनाद करतच एन्ट्री करते. त्याच्या हातात त्रिशुळ आहे. निळ्या-लाल रंगाची साडी, पायात घुंगरू, विविध स्त्री अलंकार, गळ्यात लिंबाची आणि फुलांची माळ, चेहऱ्यावर निळा-लाल रंग अशा लूकमध्ये 'पुष्पा' आहे. शिवाय तो साडीमध्येच त्याच्या दुश्मनांशी दोन हात करतो आहे.