जिल्हा बँक भरतीमध्ये २३४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र.....२४८५ उमेदवारांनी दिली परिक्षा

जिल्हा बँक भरतीमध्ये २३४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र.....२४८५ उमेदवारांनी दिली परिक्षा

सिंधुदुर्गनगरी

 

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक भरती अंतर्गत पात्र ठरलेल्या २३४ उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल पासून बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.आयबीपीएसमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २४८५ उमेदवार उपस्थित राहिले होते, ज्यापैकी गुणवत्ता यादीनुसार एका जागेसाठी तीन या प्रमाणात २३४ जणांची मुलाखतीसाठी निवड झाली आहे.या परीक्षेचा सविस्तर निकाल बँकेच्या अधिकृत वेबसाईट https://sindhudurgdcc.bank.in/ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कॉल लेटर पाठवले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपला ईमेल नियमित तपासावा आणि मुलाखतीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य असल्याचे बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळवले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे बँकेतील लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.