शिरोडा बाजारपेठेत ‘मामला’ चर्चेत...... सीसीटीव्ही मुळे अंगठी चोरीचा प्रकार उघड

शिरोडा बाजारपेठेत ‘मामला’ चर्चेत...... सीसीटीव्ही मुळे अंगठी चोरीचा प्रकार उघड

शिरोडा

 

       शिरोडा बाजारपेठेत एका सोनाराच्या दुकानातील अंगठी चोरीचा ‘मामला’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दुकानातील CCTVमध्ये एका महिलेची हालचाल कैद झाल्याचे लक्षात येताच दुकानदाराने तातडीने बाजारपेठेत धाव घेतली.महिलेला थांबवून विचारणा केली असता तिने चोरी केल्याचे नाकारले. त्याचदरम्यान तिचा पती तेथे आला आणि “दुकानात जाऊन पाहूया” असे म्हणत तिला घेऊन दुकानाकडे गेला.दरम्यान, बाजारपेठेत ‘मामला’ कळताच व्यापारीही एकत्र आले. चौकशीदरम्यान दुकानातून गेलेली अंगठी हस्तगत झाल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर शिरोडा बाजारपेठेत एकच चर्चा रंगली—

“मामला छोटा होता… पण बाजारपेठेत ‘मामले’ मोठे झाले!”

संबंधित महिलेबाबत यापूर्वीही अशा घटना घडल्याची चर्चा काही व्यापाऱ्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.