शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या तारखांबाबत शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या तारखांबाबत शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

मुंबई 


        राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार, राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सोमवार, २ नोव्हेंबर ते शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी राहणार आहे. सुट्टी संपल्यानंतर सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून शाळांमध्ये दुसरे सत्र सुरू होईल. यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.परिपत्रकानुसार, शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र सोमवार, १५ जून २०२६ रोजी सुरू झाले असून शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळेल. या सुट्टीच्या कालावधीत धनत्रयोदशी ६ नोव्हेंबर, दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा १० नोव्हेंबर आणि भाऊबीज ११ नोव्हेंबर या सणांचा समावेश आहे.दिवाळी सुट्टीनंतर सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होतील. दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ पासून शनिवार, १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर सोमवार, ३ मे ते सोमवार, १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी असेल.माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदींनुसार, शैक्षणिक वर्षात ७६ दिवसांपेक्षा अधिक सुट्ट्या देऊ नयेत आणि किमान २३० कामकाजाचे दिवस पूर्ण करावेत, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे शाळांनी सुट्ट्यांचे नियोजन करताना निर्धारित शैक्षणिक दिनदर्शिका आणि कामकाजाच्या दिवसांचे नियम पाळणे आवश्यक आहे.