कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा. माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांची मागणी.

कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा.  माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांची मागणी.

सावंतवाडी.

      वेंगुर्ला बेळगाव रोड कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली हा संपुर्ण रस्ता खड्डेमय होऊन खराब झालेला असल्यामुळे येत्या १५ दिवसात सदर रस्त्यावरील खड्डे तरी त्वरीत बुजवण्यात यावेत. कारण खड्डे वाचवण्याचा प्रयत्न करणा-यांना अपघातांना सामोरे जावे लागते त्यामुळे अपघात होऊन जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याजवळ केली आहे.