अनंत अंबानींकडून पहिल्या जागतिक वन्यजीव पशुवैद्यक विद्यापीठाची घोषणा
जामनगर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्यावनतारा या जागतिक वन्यजीव संरक्षक संघटनेने एका ऐतिहासिक प्रकल्पाचीघोषणा केली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये वनतारा विद्यापीठ सुरू होत असून, वन्यजीव संरक्षणआणि पशुवैद्यकशास्त्र या क्षेत्राला पूर्णपणे वाहिलेलेहे पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ असेल. विशिष्ट हेतूंसाठी निर्माण केलेल्या या आधुनिककाळातील गुरुकुलाचा उद्देश वन्यजीव आणिपशुवैद्यक शिक्षण या क्षेत्रात देशाला जगात प्रमुखस्थान मिळवून देणे हा आहे.पशुकल्याण क्षेत्रातील शास्त्रीय संशोधनवाढवणे तसेच वन्यजीव संरक्षणाचे भवितव्य सुरक्षितकरणे, ही या विद्यापीठाची उद्दिष्टे आहेत. पशुवैद्यकऔषधे, वन्यजीव संरक्षण आणि वन्यजीवांचे संवर्धनया क्षेत्रात जागतिक दर्जाचे तज्ज्ञ निर्माण करणे हेविद्यापीठाचे ध्येय आहे. या विद्यापीठाचे अभ्यासक्रमभारताच्या परंपरागत ज्ञानावर आधारित असतील.यातून विशिष्ट हेतूंवर आधारित आणिभविष्यकाळासाठी सज्ज असलेले शिक्षणाचे एकआदर्श मॉडल तयार होईल. विद्यापीठाच्याध्येयाबाबत बोलताना अनंत अंबानी म्हणाले की, आपण वन्यजीवांच्या सेवेसाठी सहानुभूती, ज्ञानआणि कौशल्य यांच्या साहाय्याने आपण आपलेविचार तसेच संस्था कशा घडवतो, यावरपशुसंवर्धनाचे भविष्य अवलंबून राहील. हे विद्यापीठवन्यजीवांना होणारा त्रास जवळून पाहून आणि आणित्यांच्या निगराणीच्या क्षेत्रात मोठी उणीव असल्याच्यावैयक्तिक जाणिवेतून आकारास आले आहे.विद्यापीठाचा भूमिपूजन सोहळा हिंदू परंपरेनुसारझाला. यावेळी शिक्षणशास्त्र, वन्यजीव जतन याक्षेत्रांतील अनेक मान्यवरांसह अनंत अंबानी यांनाघडवणारे शिक्षक आणि मार्गदर्शक आवर्जून उपस्थितहोते. जल, माती आणि पाषाण यांची धार्मिकपद्धतीने स्थापना करून प्रतीकात्मक पायाभरणीकरण्यात आली. विशेष म्हणजे, हा सर्व भाग भारताच्या विविध जैवविविधतेने समृद्ध असलेल्या ठिकाणांहून आणला होता. यात उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य भागातील गवताळ प्रदेश, जंगले, पाणथळ क्षेत्र, हिमालय आणि अन्यपर्वतरांगांमधील घटकांचा समावेश होता. ही संकल्पना देशाच्या समृद्ध नैसर्गिक वारशाच्यापायावर आधारित विद्यापीठ उभारण्याच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.वनतारा विद्यापीठ हे या क्षेत्रातील विविधविद्याशाखांचे एकाच शैक्षणिक परियंत्रणेत एकत्रीकरण करेल. यातील अभ्यासक्रम आजच्या जागतिक वन्यजीव संरक्षण व्यवस्थेशी निगडित असतील. बनताराच्या अनुभवाचा लाभ शैक्षणिक अभ्यासक्रमात आणि व्यावसायिक प्रशिक्षणात समाविष्ट केला जाईल. प्राण्यांविषयीची दयाभावना, शास्त्र आणि जतन या बाबी एकत्रित करून तज्ज्ञव्यावसायिकांना वन्यजीव आणि त्यांच्या परिसंस्थेच्या आरोग्याशी संबंधित आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज केले जाईल.पशुसंवर्धनाचे भविष्य हे केवळ महाविद्यालयेआणि प्रयोगशाळांमध्येच नव्हे, तर माणसाच्यासद्सद्विवेक बुद्धीमध्ये आणि प्रत्यक्ष जंगलांमध्येनिर्माण होईल, हे ध्यानात घेऊन शिक्षणाचेआधुनिकीकरण करण्याचा विद्यापीठाचा निर्धारआहे. हे ठिकाण वन्यजीव आरोग्य आणि संवर्धनयांचे ज्ञानभंडार असलेले दीर्घकालीन व्यासपीठम्हणून विकसित होईल. यावेळी वनतारा युनिव्हर्सिटी फाऊंडिंग फेलोजआणि एव्हरी लाईफ मॅटर्स या शिष्यवृत्त्यांची घोषणाही करण्यात आली.ज्ञानाचा उपयोग केवळ प्रगतीसाठीच नव्हे, तर प्रत्येक जीवाच्या संरक्षणासाठी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वनतारा विद्यापीठ हे निव्वळ शैक्षणिक व्यवस्था नसून, वन्यजीव संरक्षणासाठी सक्षम ज्ञान व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे एक जागतिक केंद्र ठरेल. वनतारा हा वन्यजीव सुरक्षा, पुनर्वसन आणि आरोग्य सेवेसाठी स्थापन केलेला विशेष उपक्रम आहे. आधुनिक पशुवैद्यक औषधशास्त्र, संगोपनआणि प्राणी जतनाचे नियोजन याद्वारे ही संस्थादुर्मीळ प्रजातींचे पुनर्स्थापना आणि वन्यजीवसृष्टीच्या संवर्धनात ख्यातनाम म्हणून नावारूपाला येत आहे.पुरातन नालंदा विद्यापीठाची मार्गदर्शक मूल्ये आणि ऋग्वेदातील 'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः' (अर्थात, आदर्श विचार सर्व दिशांनी आपल्याकडे येऊ दे) या बोधवाक्यानुसार, प्रत्येक जीवाचे संरक्षण करणारी नवी पिढी तयार करण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध असेल. ही बोधतत्त्वे अधोरेखित करणारे दोन 'बिजोलिया पाषाण' विद्यापीठाच्या भूमिपूजन स्थळी उभारण्यात आले आहेत. पुरातन विध्यन संस्कृतीची परंपरा सांगणारे हे पाषाण भारताच्या ज्ञान आणि शिक्षणाच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत.विद्यापीठात पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि विशेष अभ्यासक्रम राबवले जातील. यात प्रामुख्याने वन्यजीव औषधे आणि शस्त्रक्रिया, पोषण, वर्तणूकशास्त्र (Ethology), आनुवंशिकता, साथीचे रोग, आरोग्य संरक्षण धोरण आणि नैसर्गिक अधिवास निर्मिती यांचा समावेश असेल. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्तीदेखील दिली जाईल. विद्यापीठात अत्याधुनिक शैक्षणिक आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निवासी संकुल असेल, पशु संगोपन आणि आधुनिक पद्धतींना सक्षम करण्यासाठी कृती आधारित संशोधनावर (Action based Research) अधिक भर दिला जाईल.
konkansamwad 
