इयत्ता ४ थी आणि ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारी २०२७ रोजी.....३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

इयत्ता ४ थी आणि ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारी २०२७ रोजी.....३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग

 

  प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) रविवार, दि. २१ फेब्रुवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र आणि नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.नियमित मुदतीनंतर विलंब शुल्कासह १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२६, अतिविलंब शुल्कासह १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२६ आणि अति विशेष विलंब शुल्कासह २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.३१ डिसेंबर २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.परीक्षेचे वेळापत्रक, स्वरूप, पात्रता, माध्यम आणि शुल्क भरण्याची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.