महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या प्रचारार्थ सावंतवाडीत २ मे रोजी महायुतीची महारॅली.
सावंतवाडी.
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात २ मे ला सायंकाळी ५ वाजता महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा शुभारंभ महायुतीच्या प्रचार कार्यालयातून मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात १ हजाराहून अधिक कार्यकर्त व पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, चराठा उपसरपंच अमित परब आदी उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले की, महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अडीच लाख मताधिक्याने निवडून येणार आहेत. त्यांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के मतदान देण्याचा मानस असून त्या दृष्टीने २ मे ला महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री नारायण राणे व दीपक केसरकर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली जाणार आहे. ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, आवाहन ही त्यांनी यावेळी केले.