पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे सुयश.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे सुयश.

वेंगुर्ला.

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेची विद्यार्थिनी कु.सिद्धी भरत गावडे ही पूर्व माध्यमिक परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.
   तिने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,संचालक प्रशांत नेरुरकर,सचिव दत्तात्रय परुळेकर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.