परशुराम उपरकर यांच्या उद्या होणाऱ्या मेळाव्याला समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; राजाराम उर्फ आबा चिपकर.

परशुराम उपरकर यांच्या उद्या होणाऱ्या मेळाव्याला समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; राजाराम उर्फ आबा चिपकर.

कुडाळ.

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्याला माजी आमदार जीजी उपरकर समर्थक व राजीनामा दिलेल्या आजी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उद्या उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी केले आहे.
           जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात झालेल्या घडमोडी नंतर   कार्यकर्त्यांनी व पक्षात जोमाने काम करणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पदासहित सदस्याचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर  80 टक्के जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार जी जी उपरकर यांना समर्थन दिले असून पुढील राजकीय दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने माजी आमदार उपरकर समर्थक व राजीनामा दिलेले आजी-माजी पदाधिकारी यांनी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे.उद्या कुडाळ येथे ओंकार डिलक्स हॉल मध्ये सकाळी ११:०० वाजता होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जी जी उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी केले आहे