बांदेकर महाविद्यालयाच्या “कानन” शॉर्ट फिल्मला राज्यस्तरीय युवक महोत्सवात उत्तेजनार्थ पुरस्कार

बांदेकर महाविद्यालयाच्या “कानन” शॉर्ट फिल्मला राज्यस्तरीय युवक महोत्सवात उत्तेजनार्थ पुरस्कार

 

वेंगुर्ला

 

        मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ५८ व्या राज्यस्तरीय युवक महोत्सवात सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर महाविद्यालयाने अभिमानास्पद यश संपादन करत महाविद्यालयाचा लौकिक उज्ज्वल केला आहे.
       या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कलाक्षेत्रांमध्ये सहभाग घेऊन आपली उत्कृष्ट कला सादर केली व ३ रौप्य तसेच १ कांस्य पदक पटकावले.
       यामध्ये दोन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठामार्फत पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली असून, महाविद्यालयासाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब ठरली आहे.
         त्याचबरोबर, शॉर्ट फिल्म या विभागात सादर करण्यात आलेल्या “कानन” या चित्रपटाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाला आहे.
          या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आणि सतत अग्रेसर राहणाऱ्या महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष श्री. रमेश भाट, प्राचार्य प्रा. उदय वेले, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
        या उल्लेखनीय यशामुळे बांदेकर महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता आणि सर्जनशीलता राज्यस्तरावर सिद्ध केली आहे.