ठाकरे सेनेकडून सावंतवाडीत संदीप राणे आणि आर्या सुभेदार यांचा अर्ज दाखल

ठाकरे सेनेकडून सावंतवाडीत संदीप राणे आणि आर्या सुभेदार यांचा अर्ज दाखल


सावंतवाडी


    ठाकरे शिवसेनेच्यावतीने नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून संदीप राणे आणि सौ.आर्या सुभेदार यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील यांच्याकडे दाखल केला. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी आणि शहर संघटक निशांत तोरस्कर, युवासेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार, सुजय सुभेदार, अंकिता सुभेदार, धनश्री वराडकर, मंदार सुभेदार, योगिता जामदार, दर्शना सुभेदार, प्रमोद सावंत, संदीप वेंगुर्लेकर, संदीप केसरकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.