वेंगुर्ला शेणई बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

वेंगुर्ला शेणई बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

 

वेंगुर्ला 


      वेंगुर्ला येथील शेणई बालवाडीचा वार्षिक पारितोषिक वितरण तसेच स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला.या समारंभाची सुरुवात ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली असून त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी शिक्षक विश्वनाथ जगताप यांनी  मार्गदर्शनपर भाषण केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मनाली दाभोलकर, मानसी गावडे, महेश गावडे, उदय मालवणकर, रुपाली हरमलकर, वैभवी मालवणकर, शिवन्या चिचकर, सचिता करंगुटकर हे मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम शेणई बालवाडी संचालिका रिषा सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितिश कुडतरकर यांनी केले.