आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज बांधवांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये. धनगर समाज युवा नेता सुशांत शेळके यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग.
धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी प्रश्नी काल आबाचीबाडी,ता.जत,जि. सांगली येथील बिरुदेव खर्जे वय ४१ यांनी आत्महत्या केली.कालच बुलढाणा येथील साखळी उपोषनातील आंदोलक अशोक हुले यांचे उपोषण केल्याने तब्येत बिघडली त्यामुळे त्यांचे निधन झाले.आरक्षण अंमलबजावणीसाठी एका दिवसात दोन बांधव शहिद झाले. बांधवांनो, आरक्षण अंमलबजावणीसाठी हा मार्ग कोणीही पत्करु नका. तुमच्या नसण्याने जमातीचे न भरुन येणारे नुकसान आहेच त्यापेक्षा प्रचंड नुकसान तुमचे कुटुंबाचे होणार आहे.आज ना उद्या न्यायालयाचा निकाल निश्चितपणे जिंकू आणि लवकरच एसटी प्रमाणपत्राचे हक्कदार होऊ. न्यायालयाचे निकालानंतर सरकारवतीने चालढकल केलेवर राज्यकर्त्यांना जमातीची खरी रस्त्यावरील शक्ती दाखवू.आवश्यकता भासल्यास त्या रस्त्यावरील लढ्यासाठी आपला एक ना एक शिलेदार महत्वाचा आहे.तरी कोणीही समजा बांधवांनी आरक्षणबद्दल टोकाचा निर्णय घेवू नये असे आवाहन धनगर समाज युवा नेता सुशांत शेळके यांनी केले आहे.