अजिंक्य गावडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.

सिंधुदुर्ग.
येथील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गावडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत सामाजिक न्याय विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग प्रदेश प्रमुख डॉ.दीपा चक्रवर्ती यांनी एका पत्रान्वये ही नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा दृष्टीकोन, त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कार्यकर्तृत्वाने करावी, असे आवाहन पत्रान्वये केले आहे. अजिंक्य गावडे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.