देवगड मिठबांव येथे आढळला एक आगळा वेगळा पक्षी. मिठबांव सरपंच भाई नरे यांनी त्या पक्षाला केले वनविभागाच्या स्वाधीन.
देवगड.
तालुक्यातील मिठबांव गजबादेवी मंदिर येथील समुद्रकिनारी एक आगळा वेगळा पक्षी सापडला असून पक्षाचा आकार आणि पंखांची रचना बघता पक्षी वेगळा होता असे गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.श्री गजबादेवी मंदिरातील तात्या फाटक नावाच्या व्यक्तिला दुपारी अडीच वाजताच्या दरम्याने तो पक्षी दिसला त्यानंतर पाठक यांनी मिठबाव सरपंच भाई नरे यांच्याशी संपर्क साधून त्या पक्षाला त्यांच्या स्वाधीन केले. नरे यांनी त्या पक्षाला रामेश्वर प्रतिष्ठान यांच्या ऑफिसमध्ये आणून पाणी दिले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्या पक्षाला त्यांच्या जवळ सुपूर्द केले.
यावेळी आनंद लोके, मंगेश पाडकर, अभी पेडणेकर, सुनील जेठे, हे पक्षीप्रेमी उपस्थित होते.