वेंगुर्ल्यात संविधान गौरव अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित संविधान गौरव अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रसंन्ना (बाळु) देसाई (जिल्हा संयोजक व जिल्हा उपाध्यक्ष), सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), परिक्षक पुरुषोत्तम अंधारी, आसोली हायस्कूलच्या मुख्याध्यापक सौ. आवळे-धुरी मॅडम, पाटकर हायस्कूलचे महेश बोवलेकर सर, चमणकर हायस्कूल आडेलीचे सुनिल जाधव सर आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे प्रतिपादन शरद चव्हाण यांनी केले. स्पर्धेचे विजेते पुढीप्रमाणे प्रथम क्रमांक चिन्मय रघुनाथ कुडपकर (एम.आर. देसाई इंग्लिश स्कूल, वेंगुर्ला), द्वितीय क्रमांकनिधी यशवंत पेडणेकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), तृतीय क्रमांककाशिनाथ संतोष मठकर (रा.धो. खानोलकर हायस्कूल, मठ), उत्तेजनार्थ प्रथम वरदा सुशांत वेंगुर्लेकर (रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला), उत्तेजनार्थ द्वितीय मनोहर सदाशिव खाडे (दाभोली इंग्लिश हायस्कूल), विशेष पारितोषिक म्हणून साबाजी परशुराम राणे (अ. वि. बावडेकर हायस्कूल, शिरोडा) आणि रिया प्रशांत वराडकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा) यांचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मा. नगराध्यक्ष राजन गिरप, परिक्षक पुरुषोत्तम अंधारी, मूर्तिकार व रांगोळीकार पिंटू कुडपकर, बूथ प्रमुख आनंद मेस्त्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर सरांनी केले व आभार प्रदर्शन महेश बोवलेकर सरांनी केले .