वेंगुर्ला तालुक्यात विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिराचा शुभारंभ.

वेंगुर्ला तालुक्यात विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिराचा शुभारंभ.

वेंगुर्ला.

  प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरुकता अभियान च्या माध्यमातून वेंगुर्ले येथे विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचा शुभारंभ भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
      यावेळी भाजपा कामगार मोर्चा सावंतवाडी विधानसभा संयोजकपदी निवड झाल्याबद्दल सत्यम नारायण सावंत यांचा शरद चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळीं भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, विश्वकर्मा चे जिल्हा अध्यक्ष शरद मेस्त्री, रसिका मठकर, प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे ऑपरेटर यतीन गावडे व सना शेख आदी उपस्थित होते.
  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान, हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.विश्वनाथ धामच्या लोकार्पण सोहळ्यात श्रमिकांवर पुष्पवृष्टी करून, प्रयागराज कुंभमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुवुन, नव्या संसदेत कामगारांचे विशेष दालन उभारुन, सर्वोच्च नेतृत्व देखील देशाच्या विकासात " श्रमेव जयते " च्या ताकदीला मान्यता देत आहे हे दाखवून दिले.मोदी सरकार ने गेल्या ९ वर्षांत देशाच्या " श्रमेव जयते " या परंपरेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे.देश कौशल्याचा सन्मान करत असतानाच कौशल्य विकासावरही सातत्याने भर दिला जात आहे." श्रमेव जयते " कार्यक्रमाचे पाच उपक्रम आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री श्रम - योगी मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असे अनेक प्रयत्न कामगारांसाठी सुरक्षा कवच बनत आहेत.अशा योजनांमुळे देश आपल्या श्रमांचा आदर करतो, अशी भावना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मनात निर्माण झाली आहे.
  मोदी सरकार ने देशातील प्रत्येक कष्टकऱ्याला सामाजिक सुरक्षा कक्षेत आणण्यासाठी " श्रमेव जयते " कार्यक्रमा अंतर्गत, श्रम सुविधा पोर्टल असो, ई - श्रम पोर्टल असो किंवा या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना स्मार्ट कार्ड आणि सामाजिक संरक्षणाचे लाभ देणे असो, प्रत्येक कार्यक्रम वेगाने चालु आहेत. ४०० विविध क्षेत्रात काम करणारे २९ कोटींहुन अधिक कामगार ई - श्रम पोर्टल मध्ये सामील झाले आहेत.बांधकाम कामगार, स्थलांतरित मजुर, घरगुती कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार हे देखील असंघटित क्षेत्राशी संबंधित आहेत.त्यांना युएएन, आरोग्य, विमा यासारख्या सुविधा मिळत आहेत, असे मनोगत भाजपा कामगार मोर्चाचे सावंतवाडी विधानसभा संयोजक सत्यम सावंत यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना देसाई यांनी केले.