कुडाळ नगरपंचायतीच्या विकासाचा नवा टप्पा!
कुडाळ
कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कुडाळ येथे नवीन नगरपंचायतींना मिळणाऱ्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय अनुदान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरण या महत्वाकांक्षी कामाचा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय आग्रे, संजय पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेना प्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आनंद शिरवलकर, दादा साईल, विनायक राणे, दीपक नारकर तसेच स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार निलेश राणे यांनी कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मौलिक मार्गदर्शन केले, तसेच उपनेते संजयआग्रे यांनीही या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य व पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

konkansamwad 
