वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड

वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड

 

वैभववाडी
 

       केंद्र शासनाच्यावतीने हरियाणा, दिल्ली येथे ३ आणि ४ जुलै रोजी भारतीय संसदेमार्फत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेसाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्ष सौ. श्रद्धा रोहित रावराणे यांची निवड नगर विकास विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. भारतीय संसदेच्या वतीने लोकशाही मजबुतीकरण आणि राष्ट्र उभारणीत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समितीचा सहभाग या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील परिषद ३ आणि ४ जुलै रोजी गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेतील कार्यशाळेत देशातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांची या राष्ट्रीय परिषदेसाठी झालेली निवड हा वाभवे- वैभववाडी वासीयांचा बहुमान आहे. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत च्या कार्यकाळात प्रथमच ही संधी श्रद्धा रावराणे यांच्या रुपात प्राप्त झाली असून याबद्दल सौ. रावराणे यांचे सर्वांनी अभिनंदन केले.